मोदी सरकारला सामोरे जावे लागणार मित्रपक्षांच्या विरोधाला

uddhav
मुंबई- मोदी सरकारला रेल्वे दरवाढीच्या विरोधात आता एनडीएतील मित्रपक्षांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ही भाडेवाढ धक्कादायक असून या प्रकरणात नरेंद्र मोदींशी चर्चा करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे खासदार दरवाढ मागे घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करतील असेही त्यांनी म्हटले आहे.

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ तर मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्क्यांनी मोदी सरकारने वाढ केली आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईकरांना बसणार असून लोकलच्या मासिक पासमध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे. यामुळे मोदी सरकारवर देशभरातून विरोध होत आहे. यात आता भाजपचा सर्वात जूना मित्रपक्ष शिवसेनेचेही भर पडली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामनामधून या भाडेवाढीला विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असताना निवडून आल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आतच ही रेल्वेभाडेवाढ करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. यासाठी मी स्वतः पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा करुन भाडेवाढ मागे घेण्यास सांगणार आहे.
दरवाढ मागे घेणे शक्य नसेल तर ती कमी करावी. भाडेवाढ करताना रेल्वे स्थानकांवर चांगली सुविधा देणे गरजेचे आङे. स्थानकांवरील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वेटिंग रुम यामध्ये सुधारणा करा असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

Leave a Comment