माही उघडतोय दहा मजली सुपरबाईक शोरूम

dhoni
रांची – भारताचा क्रिकेट कप्तान महेंद्रसिग धोनी उर्फ माही आपल्या गावात म्हणजे रांचीत सुपरबाईक शोरूम उघडणार असल्याचे वृत्त आहे. माहीचे बाईक प्रेम सर्वश्रुत आहे. त्याच्याकडे हर्ले, ड्युकालिस सह अनेक कंपन्यांच्या सुपरबाईक आहेत. बाईकवरील प्रेमामुळेच त्याने सुपरबाईक शोरूम उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

यासाठी स्वतःच्या मालकीच्या १० मजली शॉपिंग कॉम्प्लेक्सची जागा त्याने निश्चत केली असून हे शॉपिंग कॉम्प्लेक्स हैदल भागात आहे. शोरूम उघडण्यासाठीच्या आवश्यक परवानग्या घेण्याचे काम सुरू असून या शोरूममध्ये जगातील विविध बाईक उत्पादकांच्या बाईक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र uया कंपन्या नक्की कोणत्या ते समजू शकलेले नाही.

देशभरातील बायकर एकत्र येत असलेल्या बाईक फेस्टीव्हल ऑफ इंडियाशीही धोनी संलग्न आहे तसेच वर्ल्ड चॅपियन बाईक स्पर्धात त्याची माही रेसिंग टीमही सहभागी होत असते असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment