दिवाळी ईद सार्वजनिक सुट्टी देण्यास ब्रिटनचा नकार

uk
ब्रिटनमधील हिंदू आणि मुस्लीम नागरिकांनी मेक ईद आणि दिवाळी पब्लिक हॉलीडे या नावाने सादर केलेल्या ऑनलाईन याचिकेवरचा निर्णय डिपार्टमेंट ऑफ बिझिनेस, इनोव्हेशन अॅन्ड स्कीलने दिला असून या दोन्ही सणांना सार्वजनिक सुट्टी देण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. सार्वजनिक सुट्टयांचे प्रमाण वाढले तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो असे कारण त्यामागे दिले गेले आहे.

ब्रिटनमध्ये हिंदू आणि मुस्लीम नागरिकांची संख्या मोठी आहे. दिवाळी आणि ईद हे सण या समुदायासाठी महत्त्वाचे आणि मोठे सण असतात. त्यामुळे या दिवसांना सार्वजनिक सुट्टी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. यावर ब्रिटन सरकारने या सणांचे महत्त्व आम्हाला मान्य आहे पण त्यासाठी बँका बंद ठेवणे आणि सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे देशाला परवडणारे नाही असे स्पष्ट केले आहे. हिंदू मुस्लीम समुदायाने केलेल्या ऑनलाईन याचिकेच्या विरोधात डू नॉट मेक ईद अॅन्ड दिवाली हॉलीडे ही ऑलनाईन साईट सुरू केली गेली असून त्याला फक्त ३५ लोकांकडून समर्थन मिळाले असल्याचेही समजते.

Leave a Comment