अंतराळातही गरमागरम कॉफीचा लुफ्त

coffee
अंतराळ स्टेशनावर दिवसे न दिवस मुक्काम ज्या अंतराळवीरांना ठोकावा लागतो, त्यांना यापुढे अंतराळातही पृथ्वीवरील गरमागरम कॉफीची त्यातही जगप्रसिद्ध इटालियन कॉफीची मजा लुटता येणार आहे. या साठी अंतराळ स्थानकावर कायमस्वरूपी कॉफी यंत्र बसविण्याची योजना इटालियन स्पेस एजन्सीने आखली आहे.

इस्पेस्प्रो नावाने हे कॉफीचे मशीन लवाझ्झा या एरोस्पेस इंजिनिअरिंग उत्पादने बनविणार्‍या आघाडीच्या कंपनीने तयार केले असून ते लवकरच अंतराळ स्थानकावर पाठविले जाणार आहे. कॉफी बरोबरच अन्य द्रव पदार्थही हे यंत्र तयार करू शकते. अंतराळातील स्थानकावर राहिलेल्या अंतराळवीरांना पॅकबंद डब्यातील अन्नच सेवन करावे लागते आणि गरमागरम कॉफी तर त्यांना दुर्लभच असते. त्यामुळे ही सोय करण्याचा निर्णय घेतल्याने इटालियन स्पेस एजन्सीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment