अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

addmission
मुंबई – नुकताच दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून, मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केले आहे. यानुसार १८ ते २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येणार आहेत.

पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. १८ ते २५पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल.

अर्जात काही त्रुटी असल्यास त्यात सुधार करण्यासाठी २६ जूनपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अल्पसंख्याक महाविद्यालयातील अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यातील प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर १८ ते २७ जूनपर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. या कोट्यांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. तसेच २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त आणि इनहाउस कोट्यातील शिल्लक जागा महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाइन सादर करता येणार आहे.

Leave a Comment