तब्बल ३७२ कोटींना विकले गेले डॉ. होमी भाभा यांचे घर

homi-house
मुंबई – उच्चभ्रू अशा मलबार हिल परिसरातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या घराचा लिलाव झाला आहे. देशातील ऐतिहासिक आणि पुरातन वास्तुंच्या हेळसांड होण्याला सरकार कसे जबाबदार आहे याचा पुरावच देणारे चित्र आता समोर आले आहे.

तब्बल ३७२ करोड रुपयांमध्ये भाभा यांचे हे घर विकले आहे. भाभा यांचे घर विकत घेणाऱ्याने त्याचे नाव जाहीर केलेले नाही. डॉ. होमी भाभांच्या घराची लिलावासाठी २६५ कोटी ही मूळ किंमत ठरवण्यात आली होती.

मात्र सरकारच्या या प्रयत्नाला विरोध करत मुंबईचे भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी हा लिलाव तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. यासाठी शेलार यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडूंची भेट घेतली होती.

सध्या या बंगल्याची मालकी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टकडे (एनसीपीएस) आहे. तसेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी या जागेवर संग्रहालय बांधावे अशी मागणी केली होती.

डॉ. होमी भाभा यांचा बंगला तब्बल १५ हजार चौरस फूट क्षेत्रफाळाच्या जागेवर बांधण्यात आला आहे. तसेच हा बंगला मलबार हिल या परिसरात असल्याने या बंगल्याला नैसर्गिक सौदर्य लाभले आहे. त्यामुळे या जागेला चांगलीच मागणी आहे.

Leave a Comment