मुंडेवर कन्या पंकजा करणार अंत्यसंस्कार

munde5
बीड – भाजपचे महाराष्ट्रातील नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यावर आज दुपारी साडेचार वाजता परळी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंडे यांची कन्या आमदार पंकजा पालवे त्यांच्या मृतदेहाला अग्नी देणार आहे. भाजपचे वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवानी, सुषमा स्वराज, भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासह अनेक वरीष्ठ राजकीय नेते येथे उपस्थित राहणार आहेत.

मुंडे यांचे काल दिल्लीत झालेल्या रस्ते अपघातात निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मुंबईत आणून त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा मृतदेह परळीकडे नेण्यात आला आहे. मुंडे यांच्या निधनाने परळी बीडवर शोककळा पसरली असून येथील सर्व व्यवहार बंद ठेवले गेले आहेत. मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी १० लाख लोक जमतील असा अंदाज वर्तविला गेला आहे.

Leave a Comment