लाडक्या नेत्याला अंतिम निरोप ;मुंबईतून विशेष रेल्वे

munde2
मुंबई – केंद्रीय ग्राम विकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून एक विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते लातूरकडे जाण्याची शक्यता लक्षात घेता ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.आज रात्री १०.३० वाजता ही विशेष गाडी मुंबई सीएसटीहून सुटणार आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मुंडेंच्या पार्थिवाला मुंबईतील ‘पूर्णा’ या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील भाजप कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. यानंतर पार्थिव विशेष विमानाने लातूरला नेण्यात येईल. तिथून मुंडेंच्या मूळ गावी बीडमधील परळी या गावात उद्या संध्याकाळी ४ वाजता, पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा लोकनेता हरपल्याने बीडमध्ये उत्स्फूर्त बंद पाळण्यात येत आहे. नागरिकांनी दुकाने, कामकाज बंद ठेवत शोक व्यक्त केला आहे. मुंडेच्या निवासस्थानाबाहेर अनेक कार्य़कर्ते आणि नागरिकांनी गर्दी जमा झाली आहे.

Leave a Comment