मोदींच्या स्वागतासाठी अमेरिका उत्सुक

kerry
वॉशिग्टन- अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन केरी यांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत एस.जयशंकर यांना ओबामा प्रशासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत स्वागत करण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा संदेश दिला असल्याचे समजते.गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगल प्रकरणात मोदींना दोषी ठरवून व्हिसा नाकारला गेला होता.

केरी यांनी राजदूत जयशंकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी हा संदेश दिला आहे. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर केरी यांनी भारतीय उच्चाधिकार्‍याशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Leave a Comment