चीनमध्ये यंदा जन्माला येणार २ कोटी बाळे

china
बिजिंग- लोकसंख्या नियंत्रणासाठी चीन सरकारने कठोर पणे राबविलेल्या एक मूल पॉलिसीत एक ऐवजी दोन मुले होण्यास सूट दिली गेल्याने यंदाच्या वर्षात चीनमध्ये दोन कोटी मुले जन्मास येणार आहेत. गतवर्षी नोव्हेबंरमध्ये चीन सरकारने ज्यांना एक मूल आहे त्यांना आणखी एक मूल होऊ शकेल अशी सूट दिल्यानंतर एकच अपत्य असलेल्या पालकांनी दुसर्‍या अपत्यासाठी चान्स घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

चीनचे राष्ट्रीय स्वास्थ व कुटुंब नियोजन आयोगाचे प्रमुख झांग शिकुन म्हणाले की यंदा खूपच मोठ्या प्रमाणावर बालके जन्मास येणार असल्याने प्रशासनाला स्थानिक आरोग्य केंद्रातून माता बालक स्वास्थ सुरक्षेसाठी तजवीज करण्याचे आदेश दिले गेले आहेत. बाळंतिणींसाठी जादा कॉट लागणार असल्याने त्याचीही व्यवस्था प्रत्येक आरोग्य केंद्रात केली जात आहे. नवजात बालकांच्या आरोग्यासाठी लसीकरणाची व्यवस्थाही केली जात आहे.

Leave a Comment