मी प्रशिक्षित हेर – एडवर्ड स्नोडेन

snowden
अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेकडून केल्या जात असलेल्या इलेक्ट्रोनिक हेरगिरीचा पदार्फाश करणारा स्नोडेन हा मामुली हॅकर असल्याचा अमेरिकन अधिकार्‍यांचा आरोप फेटाळून लावताना स्नोडेन याने त्याला हेरगिरीचे संपूर्ण प्रशिक्षण दिले गेल्याचा दावा केला आहे. स्नोडेनच्या म्हणण्याप्रमाणे त्याला इलेक्ट्रोनिक हेरगिरीचे प्रशिक्षण दिले गेले असून तो प्रशिक्षित हेर आहे. इतकेच नव्हे तर सीआयए आणि एनएससी या दोन्ही गुप्तचर संस्थांसाठी त्याने विदेशातही काम केले आहे.

२०१० साली स्नोडेन याने हॅकिंगचे उच्च तंत्रज्ञान भारतातून शिकून घेतले असल्याचे सांगितले जाते. स्नोडेनच्या म्हणण्याप्रमाणे इलेक्ट्रोनिक हेरगिरीत त्याने विशेष कौशल्य प्राप्त केले आहे आणि अमेरिका मानवी हेरांच्या तुलनेत संगणकाच्या सहाय्यानेच जगभरातील माहिती मोठ्या प्रमाणावर मिळवत आहे. स्नोडेनने हेर म्हणून जेव्हा काम केले तेव्हा तो वेगळ्या नावाने वावरत होता असेही त्याने सागितले. इतकेच नव्हे तर लष्करी संस्थांमधून हेरगिरीवर व्याख्यानेही दिली असल्याचा त्याचा दावा आहे.

स्नोडेनने सध्या रशियात ताप्तुरता आश्रय घेतला असून मे २०१३ पासून तो रशियात अज्ञात स्थळी राहतो आहे. त्याने अमेरिकेत परत येऊन त्याच्यावरील ट्रायलला सामोरे जावे असे आवाहन परराष्ट्रमंत्री केरी यांनी केले आहे.