फ्लिपकार्टने अधिग्रहणासाठी जमविला मोठा निधी

flipkart
ऑनलाईन खरेदी क्षेत्रातील अग्रणी कंपनी फ्लिपकार्टने मायंत्रा ही फॅशन क्षेत्रातील कंपनी २ हजार कोटी रूपयांत खरेदी केल्यानंतर आणखीही कांही कंपन्या विकत घेण्याची जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी सुमारे १२०० कोटी रूपयांचा निधी जमविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

रशियन इंटरनेट जायंट युरी मिलनर याच्या डीएसटी ग्लोबल या खासगी फर्मने फ्लिपकार्टमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याचे वृत्त आहे. फ्लिपकार्टचे सीईओ सचिन बन्सल यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे मात्र ही गुंतवणूक नक्की किती रूपयांची आहे ते सांगितलेले नाही. बन्सल म्हणाले की डीएसटीच्या गुंतवणुकीमुळे आम्हाला ई कॉमर्स मधील पुरवठा सेवा देणार्‍या तसेच तंत्रज्ञान फर्म खरेदी करण्यास मोठाच हातभार लागला आहे. फ्लिपकार्टने अंदाजे ७० कोटी डॉलर्स व्हेचर कॅपिटल मधून गोळा केले असल्याचे सांगितले जात आहे.

फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक केलेल्या डीएसटी ने फेसबुक मध्येही २० कोटी डॉसर्लची गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment