मुंबई-चेन्नई आज आमनेसामने

ipl

मुंबई – सातव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी प्रेक्षकांना मोठा सामना पाहण्यावची संघी मिळणार आहे. दोन वेळेचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होईल. या सामन्यातली विजेत्या संघाची लढत पंजाब व कोलकत्तास या सामन्यातील पराभूत संघासोबत होणार आहे. रविवारी मुंबईने रोमहर्षक लढतीत चेन्नलई संघाचा पराभव केला होता.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होईल.या सामन्यातील पराभूत झालेल्या टीमला स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. विजेता संघाला केकेआर-पंजाब यांच्यातील पराभूत झालेल्या टीमसोबत क्वालिफायर दोन मध्ये खेळावे लागणार आहे.

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सुपरकिंग्जने सातत्याने चांगली कामगिरी केली. तसेच रोहित शर्माच्या मुंबईनेही समाधानकारक यश संपादन करत उपांत्य फेरी गाठली. मुंबईला पहिल्या टप्प्यातील पाचही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मात्र, त्यानंतर मुंबईने भारतामध्ये दमदार पुनरागमन केले. चेन्नईने १४ पैकी नऊ सामन्यांत विजय मिळवून तिसरे स्थान गाठले. तसेच मुंबई इंडियन्स टीमने १४ पैकी सात विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर धडक मारली. त्या मुळे आता या सामन्याैत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment