पंजाब – कलकत्ता लढत पावसामुळे आज

ipl2

कोलकाताः कोलकत्तात येथे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंजाब व कोलकत्ता या संघातील सेमीफायनलचा सामना पावसाने वाहून गेला. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याात आल्याने हा दोन्ही संघा दरम्यानचा सामना बुधवारी खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारत फायनलमध्ये‍ प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी संध्याकाळी पंच नायजेल लाँग आणि एस. रवी यांनी क्युरेटर प्रबीर मुखर्जींसह मैदानाची पाहणी केली. मात्र, किमान पाच षटकांचा खेळही येथे शक्य नसल्याचे पाहणी केल्यावर समजले. बुधवारी देखील पावसाची शक्यता असल्याने दोन्ही संघांचा हिरमोड झाला आहे. पाऊस थांबण्याची ९.१० वाजेपर्यंत वाट पाहिली जाईल. यादरम्यान पाऊस न थांबल्यास किमान पाच षटकांची लढत खेळली जाईल. आयपीएलच्या नियमानुसार पाच षटकांचा खेळही होऊ शकला नाही, तर सहा चेंडूंची एक ‘सुपर ओव्हर’ होईल. यातील विजेता अंतिम फेरीत दाखल होईल, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल.

पावसामुळे ‘सुपर ओव्हर’ही होऊ शकली नाही, तर साखळीत ११ सामने जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थानावर राहणारा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. साखळीत नऊ विजयांसह कोलकाता संघ पंजाबच्या खालोखाल दुस-या स्थानावर राहिला आहे. यानंतर कोलकाता रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील विजेत्या संघाशी ३० मे रोजी होणार आहे.

Leave a Comment