
सिंधुदूर्ग – कोकणात कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांच्याविरोधात दंड थोपटनाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी पक्षातून लोकसभेसाठी राणेंना सहकार्य करा,असा फतवा काढूनही आपल्या भूमिकेशी ठाम राहताना थेट आमदारकीचा राजीनामाही दिला,मात्र आता निवडणूक संपल्यानंतर ते एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले पण त्यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांनी हाकलून दिले.
भर कार्यक्रमात,पवारांच्या उपस्थितीत केसरकरांचा अपमान
सिंधुदूर्ग येथे आज कृषी भवनाचे उदघाटन केद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले .त्यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्थानिक नेते म्हणून केसकरही या कार्यक्रमाला आले होते. मात्र, त्यांना तुम्ही येथे का आलात, तुम्हाला कुणी आमंत्रण दिले असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष जितेद्र आव्हाड यांनी केसरकर आणि त्यांच्या समर्थकांना कार्यक्रमातून निघून जा अशी अपमानास्पद वागणूक देवून अक्षरशः हाकलूनच दिले . लोकसभा निवडणूकीत केसरकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गतील आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. यामुळे कोकणात आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. अनेकदा समज देऊनही ते आपल्या मतावर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीने केसरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
