यंदा मान्सून तीन दिवस आधीच !

rain
पुणे – मान्सून आपल्या नियमित वेळेच्या तीन दिवस आधी म्हणजे १७ मे रोजीच अंदमान बेटावर पोहचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सर्वसाधारण २० मे रोजी अंदमान बेटावर दाखल होणार्या मान्सूनने मात्र यावेळी आपल्या नियोजीत वेळेच्या तीन दिवस आधी अंदमान बेटावर हजेरी लावणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

जर मान्सूनच्या पुढील प्रवासाला अनुकुल वातावरण मिळाले तर तो नियमीत वेळेत भारतात दाखल होऊ शकतो. सध्या दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनसाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत बंगालच्या दक्षिण पूर्व सागरात तो दाखल होऊ शकतो असे आयएमडीने म्हटले आहे.

सर्वसाधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो , त्यानतंर १५ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. यावर्षी मान्सूनवर ‘एल निनो’ या घटकाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून सरासरीच्या ९५ टक्केच असण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Leave a Comment