मुंबईने केले हैदराबादला पराभूत

iplmumbai

हैदराबाद- आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्यार लेंडल सिमन्स आणि अंबाती रायुडू या जोडीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर तुल्यबळ सनरायजर्स हैदराबादला त्यांच्याच मैदानावर ७ विकेट्सने चीतपट केले. विजयासाठी मिळालेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना केलेल्या भागीदारीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रथम फलंदाजी करीत असताना सनरायजर्स हैदराबादने १५८ धावांचे आव्हागन उभे केले होत. कर्णधार शिखर धवन ११ तर लोकेश राहुल १० धावांवर बाद झाले. मात्र यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या ऑस्ट्रेलियन जोडगोळीने तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत डाव सावरला.

हैदराबादने १५८ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मुरलीधरन गौतम एक धाव करून तंबूत परतला. मात्र यानंतर लेंडल सिमन्स आणि अंबाती रायुडू जोडीने दुस-या विकेटसाठी १३० धावांची मॅरेथॉन भागीदारी रचत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांबरोबर चौकार-षटकारांची बरसात केली. सिमन्सने ५० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. रायुडूने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा करीत विजय मिळवून दिला.

Leave a Comment