बेंगळूरु करणार दिल्लीशी दोन हात

ipl rajsthan

बेंगळुरुः आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला आतापर्यंत केवळ तीनच सामन्यात विजय मिळवता आला आहे. परवाच्या. सामन्यात हाता तोंडाशी आलेला विजय गमवावा लागल्याने त्याची अवस्था वाईट झाली आहे. मंगळवारी त्यांची गाठ आयपीएल गुणतक्त्यात तळाला असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी पडणार आहे. स्पर्धेत अस्तीत्व किमान टिकवून ठेवण्यारसाठी बेंगळुरुला या लढतीत विजय आवश्यक आहे.

बेंगळुरु संघ दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. या सामन्यातील यश त्यांच्या संघाला आत्मविश्वास देऊन जाईल. दिल्ली संघाची परिस्थिती तर बेंगळुरुपेक्षा खालावली आहे. या संघाला अलीकडेच कोलकाता नाइट रायडर्सकडून मारा खावा लागला. त्यामुळे त्यााना ही सामना जिंकावा लागणार आहे.

कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरने नेत्रदीपक फटकेबाजी करत ६९ धावांची खेळी साकरली अन् आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले. कुणीही यावे अन् हरवून जावे, हे आपल्याबाबत होऊन बसलेले समीकरण दिल्लीने बदलायला हवे. त्याामुळे आता हा संघ जिंकणार की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment