ड्रोनची प्रतिकृती बनविल्याचा इराणचा दावा

iran
हेरगिरीसाठी सर्रास वापरात असलेल्या ड्रोन लढावू विमानासारखीच लढावू विमाने बनविल्याचा दावा इराणच्या सैन्य दलाने केला आहे. इराणच्या अणुभट्टीबाबतची हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेने २०११ साली वापरलेल्या यूएस आर. क्यू १७० सेंटिनल या लढावू विमानाचा ताबा इराणच्या सैन्यदलाने मिळविला होता. या विमानाची नक्कल करून तसेच विमान बनविण्यात यश आल्याचा दावा इराणने केला असून अशी दोन विमाने त्यांनी बनविली आहेत आणि त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत असे सैन्यदलाकडून सांगण्यात आले आहे.

ही विमाने देशाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास खोमेनी यांनी व्यक्त केला असून अतिउच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेचे हेरगिरी विमान इराणच्या वाळवंटात सापडल्याचे जाहीर करताना या विमानाच्या प्रतिकृतीचे प्रदर्शनही करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आयातुल्ला अली खोमेनी यांनी भेट दिल्याचेही समजते.

Leave a Comment