2जीच्या किमतीत 4जी सेवा व्हिडिओकॉनची योजना

videocon
नवी दिल्ली – दूरसंचार कंपनी व्हिडिओकॉन टेलिकॉमने आपण 4जी मोबाइल इंटरनेट सेवा वर्तमान 2जी आणि 3जी किमतीवर देणार असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओकॉन टेलिकॉमचे संचालक अरविंद बाली यांनी येथे एलटीईच्या कार्यक्रमप्रसंगी ही माहिती दिली. आम्ही 4जी ची योजना 2जी आणि 3जी दरात सादर करू असे त्यांनी यावेळी म्हटले. व्हिडिओकॉनकडे सध्या 8 सेवा क्षेत्रांमध्ये सेवा देण्याचा परवाना आहे, परंतु कंपनी 5 सेवा क्षेत्रांमध्येच सेवा देत आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 4जी सेवा सादर करणार आहे. आम्ही या वर्षाच्या अखेरपर्यंत 10 शहरांपासून याची सुरुवात करणार आहोत, यानंतर ही संख्या वाढविण्यात येईल असे बाली यांनी सांगितले.