चीनमध्ये भिंत पडून 18 जण ठार

china
बीजिंग – चीनमधील शांदोंग प्रांतातील छिंगदाओ शहरात तुफानी वादळी पावसामुळे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. छिंगदाओ शहरातील एका कंपनीकडून आपल्या कर्मचाऱयांना राहण्यासाठी घरांची सोय करण्यात आली असून तेथे कर्मचारी राहत होते. येथे झालेल्या तुफानी वादळी पावसामुळे कर्मचाऱयांच्या निवासस्थानावर भिंत कोसळली. यामुळे निवासस्थानातील 18 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Comment