झिरो ग्राऊंडला ९/११ हल्ल्यातील मृताचे अवशेष आणले

groundzaro
वॉशिग्टन – अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या ११ सप्टेंबर २००१ च्या हल्यात मरण पावलेल्या अज्ञात लोकांचे अवशेष येथील ग्राऊंड झिरोवर आणण्यात आले आहेत. वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर अल कायदाच्या ओसामा बिन लादेनने योजना आखून केलेल्या भयानक हल्यात ३ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले होते मात्र कित्येकांची ओळख पटू शकली नव्हती. या सर्व अज्ञात लोकांचे अवशेष जेथे हल्ला झाला तेथे जवळच भूमिगत स्थळी राखून ठेवले गेले होते.

ग्राऊंड झिरो हा परिसर आता या हल्ल्याचे स्मारक म्हणून जतन केला गेला असून तेथे संग्रहालय उभारले गेले आहे. तेथेच या अज्ञात लोकांचे अवशेषही यापूर्वीच ठेवले जाणार होते. मात्र संबंधित मृतांच्या नातेवाईकांकडून त्याला विरोध केला गेला होता. या अवशेषात आपल्या प्रियजनांचे अवशेषही असू शकतात या भावनेने हा विरोध केला गेला होता. मात्र आता हा विरोध मावळला असल्याने हे अवशेष १५ वाहनांतून ग्राऊंड झिरोमधील संग्रहालयात हलविले गेल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment