हैदराबादचा राजस्थानवर विजय

ipl
हैदराबाद- कमी धावसंख्येवर राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला गुंडाळले होते. मात्र, राजस्था-नच्याव फलंदाजाचा भुवनेश्वर कुमार आणि डेल स्टेन या जोडीच्या भेदक मा-यापुढे निभाव लागला नाही. त्यामुळे अटातटीच्या या सामन्यात हैदराबादने ३२ धावांनी राजस्थानवर मात करीत विजय खेचून आणला.

प्रथम फलंदाजी करताना हैदाराबादच्या संघाला शेन वॉटसन आणि रजत भाटिया यांच्या मध्यमगती गोलंदाजीसमोर ९ बाद १३४ धावाच करता आल्या. यामध्ये शिखर धवनने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. वॉटसन आणि भाटिया यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

हैदराबादचे १३५ धावांचे आव्हान पार करताना भुवनेश्वर आणि स्टेन यांच्या गोलंदाजीसमोर
राजस्थानचे फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतल्यामुळे त्यांचा डाव १०२ धावांवरच आटोपला. राजस्थानकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली. राजस्थानच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविणा-या भुवनेश्वरला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Leave a Comment