गेलपेक्षाही धडाकेबाज मॅक्सवेल- सेहवाग

sehwag
कटक – आयपीएलच्या सातव्या हंगामात बुधवारी झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावा करीत गोलंदाजाची धुलाई केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ग्लेनच्या स्फोटक फलंदाजीचे कौतुक होत असताना पंजाबच्या वीरेंद्र सेहवागने त्याचे कौतुक केले. मी अथवा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलपेक्षाही ग्लेनची फलंदाजी स्फोटक व धडाकेबाज असल्याचे मत सेहवागने यावेळी व्यक्त केले.

यावेळी सेहवागला ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ही विस्फोटक फलंदाजी पाहता तुला तुझ्या फलंदाजीची आठवण होते का असा प्रश्न विचारला असता त्याने मी ग्लेन इतका धडाखेबाज नव्हतो असे स्पष्ट केले. मॅक्सवेलच्या खेळाबद्दल काय आवडते असे विचारले असता,मॅक्स्वेल याला आपल्या खेळाबद्दल कसलीही चिंता वाटत नाही. त्याला खरं म्हणजे त्याच्या गोल्फच्या खेळाची जास्त चिंता आहे. तो क्रिकेटपेक्षा गोल्फ जास्त खेळतो.

क्रिकेट खेळताना ग्लेन स्वत: १०० टक्के योगदान देतो आणि परिणामांची चिंता न करता आनंदी राहतो, असे सेहवागने सांगितले. आयपीएलच्या या हंगामात सेहवागकडूनही अपेक्षित कामगिरी होताना दिसून येत नाही आहे. त्याबद्दल त्याने येणा-या सामन्यात आपण नक्कीच चांगली कामगिरी करु असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Comment