बंगलोरपुढे पंजाबचे तगडे आव्हान

ipl2
बंगलोर – बंगलोर येथील चिन्ना स्वामी स्टेडियमवर शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यामध्ये सामना होणार आहे. पंजाबच्याम मॅक्सदवेलने बुधवारी दमदार फलंदाजी करताना चेन्नंईच्याे गोलंदाजीची पिसे काढली होती. त्यायमुळे या लढतीत देखील पंजाबच्याय संघालाच विजयची संधी अधिक आहे. यापूर्वीचा सामना पंजाब संघाने जिंकला असल्या्ने त्यांंचे पारडे जड आहे.

आयपीएलच्या सातव्या हंगामात धडाकेबाज फलंदाजांची मजबूत फळी असलेले किंग्ज इलेव्हन पंजाब आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स हे दोन संघ आमनेसामने येतील. पंजाबइतकी सातत्यपूर्ण फलंदाजी यंदा ख्रिस गेल, कोहली, डेविलियर्स यांचा समावेश असलेली बंगलोर करू शकलेली नाही. ते पाहता सध्या तरी या लढतीसाठी पंजाबलाच विजयाचे दावेदार मानण्यात येत आहे. हा सामना जिंकण्या साठी बंगलोरला दमदार फलंदाजी करावी लागणार आहे.

या सामन्यात मॅक्सवेल, मिलर, बेली यासारख्या मजबूत फलंदाजांना उत्तर देण्यासाठी बंगलोरच्या फलंदाजांना मोठय़ा खेळी कराव्याच लागतील. ते पाहता पंजाबच्या धोकादायक फलंदाजीला आवर घालण्याची जबाबदारी मिचेल स्टार्क, वरुण आरोन आणि युझवेंद्र चाहल या यजमान गोलंदाजांना करावी लागेल. या लढतीतून पुन्हा उभय संघांकडून धडाकेबाज फटकेबाजी पाहायला मिळण्याची क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment