पोलार्डने फेकली स्टार्कच्या दिशेने बॅट

polard
मुंबई – आयपीएल-७ मधील स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे. त्याप्रमाणे रंग भरत चालला आहे. त्यामुळे आता वादविवादही होवू लागले आहेत. मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात अचानक वाद झाला. यावेळी मुंबईकडून खेळणा-या किरोन पोलार्डचा रागाच्यास भरात हातातली बॅटच मिशेल स्टार्कवर भिरकावली. ही बॅट सुदैवाने स्टाईर्कला लागली नाही. यावेळी गेलने मध्ययस्थीॅ करुन हा वाद मिटवला.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्या दरम्यान बेंगळरूचा गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्यांदा बाऊन्सर टाकला आणि स्लेजिंग केली. त्यावेळी पोलार्डने हाताने इशारा करत स्टार्कला मागे जायला सांगितले होते. त्यासनंतर पुढचा चेंडू टाकत असताना पोलार्डने स्टार्कला हातानेच इशारा करत थांबण्यास सांगितले. मात्र त्यावेळी स्टार्क काही थांबला नाही. पोलार्ड स्टम्प सोडून बाजूला झाला. पण स्टार्कने पोलार्डच्या इशा-याला न जुमानता त्याच्या दिशेने चेंडू टाकला. त्यावेळी स्टार्कचा वेगवान चेंडू पोलार्डच्या अंगाला घासून गेला.

याकारणामुळे पोलार्ड चांगलाच भडकला. यावेळी तो स्टार्कच्या दिशेने पुढे सरसावला. पोलार्डने स्टार्कच्या दिशेने आपल्या हातातली बॅट फिरवली. परंतु, यावेळी त्याच्या हातातून बॅट सटकली आणि जोरात जमिनीवर आदळली. सुदैवानं स्टार्कला काहीही दुखापत झाली नाही. नाराज झालेल्या पोलार्डनं यानंतर पंचांकडे स्टार्कची तक्रार केली. यावेळी, स्टार्क-पोलार्डमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. परंतु, पोलार्डला सोबत करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने यावेळी मध्यस्थी करून स्टार्कला परत जाण्याची सूचना केली. त्यामुळे दोघातील हा वाद मिटला.

Leave a Comment