मुंबईचा बंगळुरूवर १९ धावांनी विजय

mumbi
मुंबई- आयपीएलमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा संघ सलग पाच सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आला आहे. मुंबईतील सलग दोन सामने जिंकत सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. मंगळवारी झालल्या अटातटीच्या सामन्यात मुंबईने कर्णधार रोहित शर्माच्याा अर्धशतकाच्या जोरावर १९ धांवांनी विजय मिळवून दिला.

बंगळुरूने नाणेफक जिंकत मुंबईला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांनी १८७ धावांचे आव्हांन उभे केले होते: दहाव्या षटकामध्ये मुंबईने ४ फलंदाज गमावत ८४ धावा केल्या होत्या. या स्थितीमध्ये रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनी संघाला सावरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० चेंडूंमध्ये ९७ धावांची भागीदारी रचली. रोहितने वरूण आरोनच्या १९ षटकांत ३ षटकारांसह २४ धावांची लूट करत अर्धशतक साजरे केले, त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावांची अप्रतिम खेळी साकारली. दुसरीकडे बंगळुरूवर खुन्नस काढत पोलार्डने ६ चौकारांच्या जोरावर ४३ धावा फटकावल्या. बंगळुरूने यावेळी २५ अवांतर धावा आंदण दिल्या.

मुंबईच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने पवन सुयालच्या तिस-या षटकात गेलच्या प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांसह २८ धावा लूटल्या. अर्धशतकी सलामीनंतर गेल (३८) आणि कोहली (३५) यांनी संघाचा डाव सावरला, पण गेल बाद झाल्यावर बंगळुरूच्या डावाला उतरती कळा लागली त्यांनतर युवराज व डिव्हींलियर्स लवकर बाद झाल्याने ते विजयापासून वंचीत राहिले.

Leave a Comment