दिल्लीचा राजस्थान रॉयल्सशी आज मुकाबला

ipl13_2
नवी दिल्ली- आयपीएलच्याा सातव्या पर्वातील सामने शुक्रवारपासून भारतात सुरु झाले आहेत. शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सची गाठ राजस्थान रॉयल्सशी पडणार आहे. सुरुवातीच्या सामन्यानत दिल्ली डेअरडेव्हिल्सला फारसे विजय मिळवता आले नाहीत. त्यामुळे आगामी काळात या स्पधेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दिल्ली संघाला आजचा सामना जिंकावा लागणार आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने पाच सामन्यांपैकी कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार विजयाची नोंद केली. तर तीन विजय खात्यावर जमा असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत तिस-या स्थानावर आहे. परंतु दोन्ही संघांचे आखातामधील अखेरचे सामने हे अपेक्षा उंचावणारे होते. गेल्या रविवारी दिल्लीने मुंबई इंडियन्सवर सहा विकेट राखून विजय मिळवला, तर राजस्थानने सुपर ओव्हपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात कोलकाताला हरवले होते.

जे. पी. डय़ुमिनी आणि मुरली विजय हे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत. याचप्रमाणे प्रभारी कर्णधार दिनेश कार्तिकनेसुद्धा एक अर्धशतक झळकावले आहे. परंतु सलामीवीर क्विंटन डी कॉक, रॉस टेलर आणि कर्णधार केव्हिन पीटरसन यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम यांच्या खात्यावर अनुक्रमे सहा आणि चार बळी जमा आहेत. परंतु अन्य गोलंदाजांनीही अशीच कामगिरी करून दाखवाण्याहची गरज आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment