करुण नायरमुळे राजस्थानचा रॉयल विजय

nair
नवी दिल्ली- दिल्ली डेअरडेव्हिल्स‍ने दिलेल्याच १५२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्याु करुण नायरने दमदार फलंदाजी केली. नायरने केलेल्याा ७३ धावांच्या खेळीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेले आव्हान सहज पार करीत राजस्थानचा रॉयल विजय मिळविला. यावेळी नायरला संजू सॅमसनने चांगली साथ दिली.

या सामन्यासत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने १५२ धावांचे आव्हाीन उभे केले होते. यावेळी दमदार फलंदाजी करताना दिल्ली्च्याल क्विंटन डि कॉकने ५ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावांची खेळी केली. जेपी डय़ुमिनीने ३१ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. केदार जाधवने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा फटकावल्या. या जोरावर दिल्लीने राजस्थानपुढे १५२ धावांचे माफक आव्हान उभे केले होते.

दिल्लीच्या १५२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. राजस्थाानच्या करुण नायरने ७३ धावांची दमदार खेळी केली. त्या‍ला यावेळी संजू सॅमसनने ३४ धावा करत चांगली साथ दिली. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ७ विकेट्सनी विजय मिळवून दिला. यावेळी मॅन ऑफ द मॅचचा किताब राजस्थानच्या करूण नायरला देण्यात आला.

Leave a Comment