अपराजित राहण्याचा सिलसिला कायम ठेवणार- रोहित शर्मा

rohit-shrma_0
मुंबई- आयपीएलच्या सातव्या पर्वात गेल्या वर्षीच्या. विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने सर्वांची निराशा केली आहे. सुरुवातीच्या सलग पाच सामन्याात पराभव पत्कारावा लागल्यााने मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टा‍त आले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील मैदानावर होत असलेले सर्व सामने जिंकून गेल्या वर्षीचा अपराजित राहण्याचा सिलसिला कायम ठेवणार असल्याचे मत मुंबई इंडियन्सनचा कर्णधार रोहित शर्मा यांने व्यक्ति केले.

शनिवारी मुंबई इंडियन्सचा सामना आतापर्यंत अपराजित राहिलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. यावेळी बोलताना रोहित शर्मा म्हलणाला, एकावेळी एकाच सामन्यावर लक्षकेंद्रित करुन कामगिरी करायला हवी. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून ते अगदी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पाचव्या सामन्यापर्यंत आम्ही चुकांची पुनरावृत्तीच केली. हे आता थांबवायला हवे’.

गेल्या वर्षी मुंबईने घरच्या मैदानावरील आठही सामने जिंकले होते. हा अपराजित राहण्याचा सिलसिला त्यांना आता शनिवारीदेखील कायम राखायचा आहे. अर्थात हे वाटते तितके सोपे नाही; कारण शनिवारी मुंबईपुढे आव्हान असेल ते सध्या गुणतक्त्यात अव्वल असलेल्या पंजाब संघाचे.
यंदाच्या मोसमातील मुंबईच्या यूएईमधील पाच सामन्यांवर नजर टाकल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की फलंदाजांनी आतापर्यंत कामगिरी उंचावलेलीच नाही. स्वतः कर्णधार रोहित शर्मादेखील धावांच्या दुष्काळातून जातो आहे. रोहितही ही बाब मान्य करतो. ‘फलंदाजांनी निराशाच केली आहे हे मान्य आहे. फटक्यांची निवडही चुकली. आता मात्र आम्ही भारतात परतलो आहोत. येथील खेळपट्ट्या व वातावरणाची आम्हाला जाण आहे तेव्हा आता तरी फलंदाजांची कामगिरी उंचावेल अशी आशा करायला हरकत नाही’, असा आशावाद रोहित व्यक्त करतो.

Leave a Comment