कोलकत्ता विरूध़्द राजस्‍थानचे पारडे जड

ipl
अहमदाबाद – कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यांत या पर्वात दुस-यांदा लढत होत आहे. पहिला सामना दोन्ही संघादरम्यान टाय झाला होता. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये हा सामना राजस्थानने जिंकला होता. या सामन्यात कोलकत्यालापण विजयाची संधी होती पण त्याने गमावली. त्याामुळेच या सामन्यात राजस्थातनचे पारडे जड असणार आहे.

सोमवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचे याच्यात दुस-यांदा लढत होत आहे. शेन वॉटसन आणि सहकारी विजयाचा ‘चौकार’ लगावण्यास उत्सुक आहेत. त्याच वेळी प्रतिस्पर्धी गौतम गंभीर आणि कंपनी पराभवाची मालिका संपवण्यास इच्छुक आहे. राजस्थानने सहा सामन्यांत चार विजय मिळवताना आठ गुणांसह तिसरे स्थान राखले आहे. तितकेच सामने खेळताना कोलकाताला केवळ दोनच गुण मिळवता आलेत.
फॉर्मात असलेली फलंदाजी हे राजस्थानच्या सलग विजयांचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे.

अजिंक्य रहाणेसह संजू सॅमसन आणि कर्णधार वॉटसनने फलंदाजीत मोठे योगदान दिले असले तरी वॉटसन आणि सॅमसनकडून आणखी अपेक्षा आहेत. अष्टपैलू जेम्स फॉकनरलाही कामगिरी उंचावता आलेली नाही. दिल्लीविरुद्ध चमकदार खेळी करणारा करुण नायरमुळे फलंदाजीत स्थिरता आली आहे. जेम्स फॉकनर आणि केन रिचर्डसनसह रजत भाटिया या वेगवान आणि मध्यमगती त्रिकुटाने ब-यापैकी सातत्य राखले तरी लेगस्पिनर प्रवीण तांबेचा अचूक मारा त्यांच्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे.