चेन्नईचा आठ गडी राखून विजय

chennai
नवी दिल्ली- आयपीएलच्या रोमांचकारी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने आठ विकेट्स राखून दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केले. या उत्कंठावर्धक लढतीत सलामीवीर ड्वेन स्मिथ आणि सुरेश रैना यांच्यास तुफानी फटकेबाजीच्या् जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आठ विकेट्स व दोन चेंडू राखून दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय मिळविला.

त्याआधी नाणेफेक जिंकून दिल्ली संघाने फलंदाजी स्विकारली. त्यांची सुरुवात थोडीसी निराशाजनक झाली. मात्र, त्यानंतर दिनेश कार्तिकच्या दमदार अशा अर्धशतकाच्याच खेळीमुळे त्यांने दिल्लीला २० षटकांत ५ बाद १७८ धावा केल्या होत्या. फलंदाजीत अन्यर सर्वांनी दिनेश कार्तीकला दमदार फलंदाजी करीत साथ दिली.

दिल्लीने विजयासाठी ठेवलेले १७९ धावांचे भलेमोठे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्याअ चेन्नईला ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने चांगली सलामी दिली. त्याननंतर ड्वेन स्मिथ आणि सुरेश रैनाची घणाघाती खेळी केली. सिमथने ५१ चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी करताना ८० धावा केल्यास. चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा ड्वेन स्मिथ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रैनाने नाबाद ४७ धावांची खेळी केली. यामुळे दोन चेंडू शिल्लाक असताना चेन्नई सुपर किंग्जने आठ विकेट्स राखून दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाचा धक्का दिला.

Leave a Comment