राजस्थानची कोलकातावर मात

ipl2
जयपूर – राजस्थानचा लेग-स्पिनर प्रवीण तांबेने केलेली हॅटट्रिक व कर्णधार शेन वॉटसनने केलेली दमदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. या चित्तथरारक सामन्यांत विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य पार करणा-या कोलकत्यावर राजस्थान रॉयल्सने १० धावांनी शानदार विजय मिळवला. आयपीएलच्या सातव्या हंगामात पहिली हॅट्ट्रिक नोंदवण्याचा मान मिळवणाऱ्या प्रवीण तांबेने सामनावीर पुरस्कार प्राप्त केला.

या उत्कंपठावर्धक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या राजस्थानने ६ बाद १७० धावा केल्या. फॉर्मात असलेल्या करुण नायर (४४), अजिंक्य रहाणे (३०) यांनी दमदार सलामी नोंदवली. त्यांनी संजू सॅमसन (३७) आणि शेन वॉटसन (३१) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोलकाता नाइट रायडर्सकडून सुनील नरिनने २८ धावांत दोन बळी घेतले.

त्यानंतर कोलकाताच्या डावात उथप्पा आणि गंभीर यांनी चांगली सलामी नोंदवत विजयाच्या आशा निर्माण केल्या. परंतु वॉटसनने १५व्या षटकात गंभीर (५४), उथप्पा (६५) आणि आंद्रे रसेल यांना तंबूची वाट दाखवली. त्यानंतर १६व्या षटकात प्रवीण तांबेने कमाल करताना मनीष पांडे, युसूफ पठाण आणि रयान टेन डोइश्चॅट यांना भोपळा फोडण्याचीही संधी न देता माघारी पाठवून एक संस्मरणीय हॅट्ट्रिक साजरी केली. त्यामुळे कोलकाताची ६ बाद १३२ अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर शाकिब अल हसनने कोलकाताच्या विजयासाठी शर्थीने प्रयत्न केले, परंतु ते अपुरे ठरले. त्याीमुळे कोलकत्या ला दहा धावांनी पराभव पत्कपरावा लागला.

Leave a Comment