नोकियाचा चेन्नई प्रकल्प मायक्रोसॉफ्टकडे नाही

टॅक्स प्रकरणात अडकलेल्या फिनलंडच्या नोकिया कंपनीचा चेन्नई येथील प्रकल्प मायक्रोसॉफ्टकडे सध्या तरी हस्तांतरीत केला जाणार नसल्याचे समजते. त्या ऐवजी हा प्रकल्प करारावर सोपविला जाईल. नोकिया आणि मायक्रोसॉफ्टमधील ग्लोबल हँडसेट विक्री कराराची मुदत शुक्रवारी संपते आहे. मात्र चेन्नई प्रकल्प प्रकरण सध्या हायकोर्टात असल्याने त्याचे हस्तांतरण होणे सध्या शक्य नाही असे नोकियाच्या भारतातील प्रवक्त्याने सांगितले.

नोकिया आणि मायक्रोसॉफट करारानुसार हँडसेट उत्पादन प्रकल्पही मायक्रोसॉफ्टकडे हस्तांतरीत केले जाणार आहेत. चेन्नईच्या प्लांटमध्ये ६६०० कर्मचारी असून नोकियाने यापूर्वीच त्यांच्यासाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. नोकियाच्या जगातील मोठ्या प्रकल्पात या प्लांटचा समावेश आहे आणि भारतातील हा एकमेव प्लांट आहे. दिल्ली हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर नोकिया हा प्लांट वेगळा करार करून मायक्रोसॉफ्टला देईल असे सांगितले जात आहे.