वाढदिवस … मतदानासाठी दुबईतून मुंबईत!

मुंबई – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण केले. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच मतदान असल्याने सचिनने मतदानाचा हक्क बजावायला प्रथम प्राधान्य दिले. त्यासाठी तो दुबईतून थेट मुंबईला आला . सचिनने पत्नी अंजलीसोबत जाऊन घराजवळच्या मतदान केंद्रात मतदान केले.

मतदान करुन माझ्या वाढदिवसाची सुरुवात झाली आहे असे सचिनने मतदानानंतर सांगितले. बॉलिवुडचे तारकामंडळ मतदान सोडून पुरस्कार सोहळयासाठी अमेरिकेला जात असताना, सचिन खास मतदानासाठी दोन दिवसांपूर्वी दुबईहून मुंबईत आला.

Leave a Comment