दहशतवादी तळावर पाक विमानांचे हल्ले – ३७ ठार

पेशावर – पाकिस्तानी लष्करी विमानांनी उत्तर पश्चिम भागातील अशांत काबायली क्षेत्रात अफगाण सीमेवर दहशतवादी तळांवर केलेल्या हल्लयात ३७ दहशतवादी ठार तर १६ जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. हे हल्ले मोठ्या क्षेत्रावर करण्यात आले.

गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार बादभेर, चरसड्डा, इस्लामाबाद भाजी मंडई आणि चमन येथील दहशतवादी हल्यात सामील असलेले अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले आहेत. हल्ले झालेल्या ठिकाणांना भेट देण्यास पत्रकारांना मज्जाव केल्याने मृतांचा नक्की आकडा समजू शकलेला नाही मात्र सरकारी माहितीपेक्षा तो अधिक असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लष्कर ए इस्लाम आणि तहरिक ए पाकिस्तान यांच्या तळांवर प्रामुख्याने हे हल्ले केले गेले आहेत.

विशेष म्हणजे तहरिक ए पाकिस्तान आणि पाक सरकार यांच्यात शांती वार्ता सुरू असतानाच हे हल्ले केले गेले आहेत.

Leave a Comment