दाभोलकर हत्याप्रकरण ;तपासासाठी सीबीआयची तयारी

मुंबई  – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तपास करण्यास सीबीआयने तयारी दर्शवली आहे. दाभोलकर यांच्या हत्येला अनेक महिने उलटून गेले तरी मारेकऱ्यांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे  या प्रकरणाचा तपास पुणे क्राइम ब्रँचकडुन काढून सीबीआयकडे द्यावा अशी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयला आपल म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज उच्च न्यायालयात  झालेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यास तयारी दर्शवली आहे.केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली होती. पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.