
मुंबई – महाराष्ट्रात उद्या [दि. २ ४ ]गुरुवारी तिस-या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे . मतदारराजा एकूण ३३८ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहे.त्यात दिग्गजांचे काय होते आणि नव्याने कुणाचा संसदेत प्रवेश होतो ,हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असले तरी मतदानाची टक्केवारी महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रातील एकूण १९ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून, यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाच समावेश आहे. राज्यात पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनी उत्साहाने मतदान केले होते. मुंबईतील याआधीची मतदानाची आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नाही. पण संपूर्ण देशातच मतदानाची टक्केवारी वाढल्याने यंदा मुंबईत वेगळे चित्र पहायला मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
