नोकिया बनणार मायक्रोसॉफ्ट मोबाईल्स

फिनलंडची हँडसेट मेकर कंपनी नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील विक्री करार एप्रिलमध्ये पूर्णत्वास गेल्यानंतर नोकियाचे फोन मायक्रोसॉफ्ट मोबाईल्स या नावानेच बाजारात आणले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या दोन्ही कंपन्यांच्या करारासंदर्भातले एक पत्र लीक झाले असून त्यात वरील बाबीचा उल्लेख करण्यात आला असल्याचे समजते.

या करारानुसार नोकिया आता मायक्रोसॉफट मोबाईल ओवायएस कंपनी होईल. फिनिश भाषेत ओवायएसचा अर्थ पब्लिक स्टॉक कंपनी असा आहे. मायक्रोसॉफट ओवायएस ही पूर्णपणे कायदेशीर कंपनी असेल आणि वॅट, आयडी याच नावाने इश्यू केले जातील. अर्थात मायक्रोसॉफट कंपनीने नोकिया मोबाईल विमागाची खरेदी केली असल्याने केवळ मोबाईलपुरताच नावाचा हा बदल असेल. नोकिया त्यांची अन्य उत्पादने नोकिया याच नावाने विकू शकणार आहे असाही खुलासा केला गेला आहे.