चीनमध्ये पोर्नसाईट झाल्या बंद

इंटरनेट सर्वाभिमुख आणि आबाल वृद्धांपर्यंत सर्वांसाठी वापरता यावे यासाठी चीन सरकारने एक अधिसूचना जारी करून १०० हून अधिक पोर्न साईट तसेच हजारो सोशल नेटवर्क साईट बंद केल्या असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात सरकारने क्लिनिंग द वेब या नावाने मोहिमच सुरू केली आहे.

चीनमध्ये पोर्नोग्राफी बेकायदेशीर असून पूर्वीपासूच पोर्नसाईटवर बंदी आहे मात्र तरीही अनेक पोर्नसाईट तेथे वेबसाईटवरून दिसत होत्या. नवीन मोहिमेद्वारा सरकारने वेबसाईटवर सेन्सॉरशीप लागू केल्याची टीका विदेशी तज्ञांकडून केली जात आहे. मात्र सरकारने त्या टीकेची दखल न घेता ११० हून अधिक अश्लल वेबसाईट आणि ३०० हून अधिक सोशल नेटवर्कींग साईट बंद केल्या असल्याचे समजते.