चंद्राच्या प्रकाशाने झगमगणार रात्री

लंडन – रात्रीच्या वेळी रस्त्यावर लावावे लागणारे पददिवे व त्यामुळे खर्च होणारी वीज, कार्बन उत्सर्जनामुळे होत असलेले ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषणामुळे असह्य बनत चाललेले मानवी जीवन यावर काय उपाययोजना करता येतील याचे चर्वितचर्वण जगभरातील संशोधकांत सुरू असताना स्वीडनच्या फोरियो या कॉस्मेटिक कंपनीने एक अनोखाच मार्ग सुचविला आहे. त्यांनी चंद्राच्या कांही भागाला पॉलिश करून रात्रीही चंद्राच्या प्रकाशाने झगमगून टाकता येतील असा दावा केला आहे.

कंपनीचे सीईओ पॉल परोस म्हणाले की चंद्राच्या पृष्ठभागाच्या केवळ ०.१ टक्का इतका भाग पॉलिश करण्याची आमची योजना असून त्यामुळे रात्रीही दिवसासारखा प्रकाश पृथ्वीवर येईल. यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवे लावण्याची गरज राहणार नाही पर्यायाने वीज कमी लागेल. वीज मिर्मितीतून होणारे प्रदूषण कमी होईल. उर्जा निर्मितीत होणारे कार्बन उर्त्सजन कमी झाल्याने ग्लोबल वॉर्मिंग वर नियंत्रण येईल. अर्थात यासाठी चंद्रावर उपलब्ध असलेल्या पदार्थांचाच वापर केला जाईल असाही त्यांचा दावा आहे.

तज्ञ वैज्ञानिकांच्या मते मात्र ही बाब अशक्य कोटीतील असून सूर्याइतका प्रकाश चंद्रापासून मिळविण्यासाठी किमान चार लाख चंद्रांची आवश्यकता आहे.

Leave a Comment