अजित पवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

पुणे  – पाणी बंद करू असे धमकावणाऱ्या  उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा अदखलपात्र आहे असे  पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे . या प्रकरणाचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सोपवलेला असून  बारामती तालुक्यामधील वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. भादंवि १७१ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला  आहे.    

प्रचाराची वेळ संपून गेल्यावरही अजित पवार प्रचार करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. मात्र त्यानुसार कारवाई करण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळेंना मत दिले नाही तर पाणी बंद करू अशी धमकी अजित पवार देत आहेत असा एक व्हिडिओ काल प्रसिद्ध झाला होता. मात्र  अजित पवार यांनी आरोप फेटाळले असून  केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही अजितदादांची पाठराखण केली आहे. 

 

Leave a Comment