गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी राज ठाकरे सरसावले !

बीड – बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीने पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातल्याने आता भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना साथ देण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सरसावले आहेत आणि त्यांनी मुंडे यांनाच मत द्या अशी सादही मतदारांना घातली आहे. 

बीड जिल्ह्यातील लढत चुरशीची होणार आहे. मुंडे यांच्याविरोधाच राष्ट्रवादीने सुरेश धस यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर, आम आदमी पक्षातर्फे अभिनेता नंदू माधव निवडणूक लढवत आहेत.

मनसे कार्यकर्त्यांनी मुंडे यांनाच पाठींबा द्यावा असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.  तसे पत्र राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवले आहे.आणि गोपीनाथ मुंडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.मराठवाड्यात मनसेचा एकही उमेदवार नाही. मात्र, याठिकाणी मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे  मुंडे यांची ताकद वाढणार असून, मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांची एकठ्ठा शेकडो मते मुंडे यांना मिळणार आहेत.

Leave a Comment