सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गत आघाडीमध्ये निर्माण झालेला तणाव शमविण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड हे सरसावले आहेत. त्यांनी सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांची झाडाझडती घेताना पक्षात पवार साहेबांपेक्षा कोणीही मोठा नाही ,असे ठणकावून सांगितले. सिंधुदुर्गमधून कॉंग्रेसचे वरिष्ठ आणि शक्तिमान नेते नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ.निलेश राणे हे निवडणूक लढवत आहेत.
मात्र, डॉ. निलेश राणे हे राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांना विश्वासात घेऊन काम करत नसल्याचा आक्षेप कायम ठेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाब विचारला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आव्हाड सरसावले आहेत,त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे समजून घेतले.
मात्र कार्यकर्त्यांनी प्रचार करणार नाही या भूमिकेवर ठामपणा दर्शविल्याने आव्हाडांनी सर्वांना पवार साहेबांचे आदेश मानावेच लागतील अशा शब्दात फटकारले . परिणामी चारशे जणांनी का राजीनामे दिले ?तर प्रचारासाठी दबाव आणू नये यासाठीच हा पवित्रा घेतल्याचे समर्थन राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.