
प्रेमाला वयाचे, भाषेचे, जात पातीचे बंधन नसते अशी म्हण आहे. ही म्हण झारखंडमधील तारा टूडू याने खरी करून दाखविली आहे. तारा तब्बल १०६ वर्षांचे वृद्ध आहेत आणि त्यांनी त्यांची २० वर्षे प्रेमिका असलेली ४५ वर्षीय बहामुनी मुर्मू हिच्याशी मंगळवारी विवाह केला आहे. या अनोख्या विवाहाला ताराच्या नातवंड पतवंडांसह सर्व कुटुंबिय हजर होतेच पण लग्नाविषयी औत्सुक्य वाटल्याने आसपासच्या गावातूनही शेकडो लोक हे लग्न पाहण्यासाठी जमले होते असे समजते.
