बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या कामात घोटाळा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या‍ बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाच्या सुशोभिकरणाच्या कामात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाच्या सुशोभिकरणाचे काम ‘निसर्ग उद्यान’ या संस्थेला देण्याात आले आहे. या संस्थे‍ने कामात चार लाख रुपये जादा लाटल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांची किंमत एक लाख ३४ हजार होते. पण केवळ झाडांची किंमत साडेपाच लाख दाखवण्यात आली आहे. शिवाय इतर कामासाठी २८ लाखांचे बिल लावले आहे. या कामाच्या बिलावर मनसेने आक्षेप घेत या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, ‘निसर्ग उद्यान’ या संस्थेला स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या आदेशानेच काम देण्यात आले होते. आगामी काळात देण्यात येणा-या सर्व बिलांची छाननी झाल्याशिवाय कोणतीही रक्कम अदा केली जाणार नाही अशी ग्वाही पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिली आहे. जादा रकमेचे बिल देण्यात आल्याचे निर्दशनास आल्यास त्यांच्यावर काय कारवाई होणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.