मिरपूर- बांगलादेशमध्ये होत असलेल्या टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. त्यांची लढत शुक्रवारी आता उपात्यफेरीत दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे स्पीनर्स अमित मिश्रा, आर. अश्विन व रवींद्र जाडेजाने फलंदाजावर दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे अमित मिश्रा, आर. अश्विन यांच्या गोलंदाजीचा धसका दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानी घेतला असून या दोघांच्या गोलंदाजीचा अभ्यास त्यांनी आतापासूनच सुरू केला आहे.
याबाबत बोलताना दक्षिण आफ्रिकेचा जीन पॉल ड्युमिनी म्हणाला, टीम इंडियाच्या स्पिनर्सची स्तुती करावी तेवढी कमी आहे. त्यांरनी आतापर्यंतच्या एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजाना डोके वर काढू दिले नाही. टीम इंडियांच्या मिश्रा व अश्विन यांची कामगिरी असाधारण आहे. सध्या फॉर्मात असलेल्या मिश्र व अश्विन यांचा मुकाबला करणे म्हणजे आमच्यासाठी मोठे आव्हानच आहे.
उपांत्य सामन्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेने धडक मारली असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवर ड्युमिनी समाधानी नाही. जीन पॉल ड्युमिनी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना तो अमित मिश्रा खेळला आहे. मात्र याचा फारसा फायदा होणार नाही, असे ड्युमिनीचे मत आहे. ‘फक्त मीच नव्हे तर आमच्या संघातील इतर सदस्यही आयपीएलमधून मिश्रासह खेळले आहेत. त्याच्या गोलंदाजीविषयी थोडीफार माहिती आहे, पण त्या माहितीवर मी अमित मिश्रबाबत डावपेच आखणे चुकीचे ठरेल. तेव्हा त्याला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही डावपेच आखले असले तरी त्यांची अमलबजावणी व्हावी, यावर भर द्यायचा आहे’, असेही ड्युमिनी यावेळी बोलताना म्हणाला.