राज ठाकरे घेणार ३० सभा

पुणे: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वाभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ३० सभा घेणार आहेत. त्यांचा दौरा निश्चीत करण्यात आला असून पुण्यातील दोन उमेदवारांच्या प्रचरार्थ ते तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोमवारी राज ठाकरे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सोमवारी पुण्यातल्या नदीपात्रात सभा होणार आहे.

सोमवारी होत असलेल्या प्रचारसभेला पुण्याकडे रवाना होण्याापूर्वी त्यांनी त्यांचे कुलदैवत एकवीरा देवीचं दर्शन घेतले आहे. त्यानंतर ते पुण्याच्या सभेसाठी रवाना होणार आहेत. पुण्यात होणा-या पहिल्याच सभेत ते आघाडी व महायुतीच्या मंडळीचा ते कशाप्रकारे समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्यातील सभेने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आगामी काळात त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात राज्यभरात तब्बल ३० सभा होणार आहेत. या सर्व सभेकडे त्यांच्या चाहत्याचे लक्ष लागून राहिले आहे.