नर्मदा बचाव आंदोलानचे फलित काय झाले मेधाताई सांगणार का!

विशेष प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर या मुंबईतून निवडणूक लढवत आहेत. खर तर त्यांनी गुजरातमधील नर्मदा खो-यातील आदिवासींसाठी आंदोलन केले होते पण सातत्याने आंदोलन महाराष्ट्रातच केल्यामुळे त्यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. आता लोकांकडे मत मागताना आंदोलनाच्या नेत्या म्हणून त्यांचे असलेले उत्तरदायीत्व मानून आपल्या नर्मदा आंदोलनाचे फलित काय मिळाले ते संघर्ष सोडून राजकारणात उतरलेल्या मेधाताई मतदारांना जाहीरपणे सांगणार का असा प्रश्न मतदारांचा मनात आहे.

मेधा पाटकर म्हणजे आदिवासी किंवा अन्यायग्रस्तांसाठी लढणा-या नेत्या अशी त्यांची प्रतिमा नर्मदा बचाव आंदोलनाने तयार झाली आहे. त्यांनी आंदोलनाच्या सुरूवातीला नर्मदा धऱणालाच विरोध केला होता. पण धरण उभे रहात असलेले बघून नंतर हा विरोध धऱणाच्या उंचीवर करण्यात आला. त्यासाठी मणीबेलीत मेधाताईंना जलसमाधी आंदोलन केले. आदिवासी महिलांसोबत त्या पाण्यात उतरून जलसमाधी घेण्याचे प्रकार त्यांनी केले.

हे सर्व कव्हर करण्यासाठी पुण्यामुंबईतील निवडक पत्रकारांना तेथे नेण्यात येत होते. तेही मोठ मोठ्या रकानेच्या रकाने बातम्या या आंदोलनाच्या देत होते. मेधाताईनी नर्मदा खो-यात संघर्ष केला पण त्यापेक्षा जास्त नर्मदा बचावची आंदोलने महाराष्ट्रात अन मुंबईत झाली. पण शेवटी धरणही झाले अन त्याची उंचीही वाढली. मग मेधाताईंच्या आंदोलनातून साध्य काय झाले ?  हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे. लोकसभेची निवडणूक मेधा पाटकर या ईशान्य मुंबईतून लढवत आहेत. धारवीसह मोठ्या झोपडपट्या असलेला हा मतदारसंघ आहे. त्यांनी आंदोलन गुजराथमधील आदिवासींसाठी केले मग निवडणुकीसाठी मुंबई का निवडली अशा अनेक शंका त्यांच्या उमेदवारीमुळे लोकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. या शंकांचे निरसन मेधाताई करणार का?  त्यांनी केले पाहिजे कारण सरकार विरूद्ध भांडताना सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या उत्तरदायीत्वाचा (आकाऊंटेबिलिटीचा) मुद्दा त्या आग्रहाने मांडतात. मग आता मेधा ताई राजकारणात आलेल्या असल्याने त्यांनाही तोच मुद्दा उत्तरदायीत्वाचा (आकाऊंटेबिलिटीचा) मुद्दा लागू होतो. याच न्यायाने त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाचे फलित काय हे महाराष्ट्रातील जनतेला सांगितलेच पाहिजे अशी मतदारांची भावना आहे.

Leave a Comment