
वॉशिग्टन – अमेरिकेत गुंतवणूक केलेल्या भारतीय कंपन्या अमेरिकेतील बेरोजगारी कमी करण्यास चांगलाच हातभार लावत असून या कंपन्यांनी अमेरिकेत आत्तापर्यंत ८१ हजारांहून अधिक जणांना नोकर्या दिल्या असल्याचे सीआयआयच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. भारतीय कंपन्या जागतिक बाजारात आपला ठसा उमटवित असतानाच जगातील सर्वाधिक शक्तीशाली देशात रोजगार देण्यातही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत असे या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले गेले आहे.
